खा. निंबाळकर व आ. पाटील यांनी घेतली देठे कुटुंबियांची भेट

Admin
0

 

The youth of the Maratha community should not take extreme steps: MP. Omraje Nimbalkar

The youth of the Maratha community should not take extreme steps: MP. Omraje Nimbalkar


बार्शी विशेष : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.


मूळचे बार्शीचे असलेले प्रसाद देठे मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली.


आत्महत्या हा आरक्षण मिळण्याचा पर्याय असू शकत नाही. आपल्या कुटुंबियांच्या जबाबदारीचे भान ठेऊन समाजातील तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन खा. ओमराजे निंबाळकर यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)