कठीण प्रसंगावर मात करून यशस्वी व्हा : तहसिलदार शेख

Admin
0

 

Overcome adversity and succeed: Tahsildar Sheikh

Overcome adversity and succeed: Tahsildar Sheikh


व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या सन्मान सोहळा


बार्शी विशेष : कठीण प्रसंगावर मात करून यशस्वी व्हा असे आवाहन तहसिलदार एफ. आर. शेख यांनी विद्यार्थ्यांना केले. 'व्हॉईस ऑफ मीडिया' शाखा बार्शी यांनी आयोजित केलेला पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान सोहळा बार्शीतील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी येथे संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.


कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार एफ. आर. शेख होते, तर माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, व्हॉईस ऑफ मीडिया सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे, ज्येष्ठ पत्रकार अरुण बळप, संतोष सूर्यवंशी, नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद, कामगार नेते अजित कांबळे, विक्रमसिंह पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


या कार्यक्रमात दहावी, बारावी, शिष्यवृत्ती यात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कु. पुजा संतोष सूर्यवंशी, कु. आदित्य गणेश भोळे, कु. रविराज नितीन भोसले, कु. सारंग सुनील अवघडे, कु. चाणक्य संदीप अलाट, कु. ओम रवींद्र माढेकर, कु. सक्षम शाम थोरात, कु. रिया सचिन आजबे, हुमेरा रियाज पठाण, कैफ रियाज पठाण, कु. ओंकार समाधान चव्हाण, आहील अमीन गोरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच शालेय साहित्याचे संच विद्यार्थ्यांना देण्यात आले.


व्हॉईस ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष हर्षद लोहार यांनी पत्रकारांना पक्की घरे, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य, पत्रकारांचे स्किल डेव्हलपमेंट व त्यांच्या अडचणी सोडविण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून करत असल्याचे प्रास्ताविकातून सांगितले. उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, संदिप आलाट, सुनील अवघडे, अनिता भोसले, संतोष सूर्यवंशी, शब्बीर वस्ताद यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष विजय शिंगाडे, खजिनदार प्रविण पावले, शाम थोरात, निलेश झिंगाडे, समाधान चव्हाण, विक्रांत पवार, अमीन गोरे, श्रीशैल्य माळी, संगीता पवार, उमेश देशमाने यांनी परिश्रम घेतले. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व निलेश झिंगाडे यांनी आभार व्यक्त केले.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)