चूल पेटवून अनोख्या पध्दतीने नोकर भरती मेळाव्याचे उद्घाटन

Admin
0

The job recruitment fair was inaugurated uniquely by lighting a stove


The job recruitment fair was inaugurated uniquely by lighting a stove


बार्शी विशेष : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरजवंत मराठा समाजाने आयोजित केलेला नोकर भरती मेळावा श्री शिवाजी महाविद्यालय येथील संत तुकाराम सभागृहात संपन्न झाला. 


मेळाव्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, संत कबीर, कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन झाली. 


बेरोजगारांना नोकरी मिळून त्यांच्या प्रपंचाच्या चुली प्रज्वलीत व्हाव्यात यासाठी प्रतिकात्मकपणे बौद्ध गुरु नागसेन श्रीवास्ते, श्री रामलिंग शिवाचार्य परांडकर महाराज, मौलाना अशपाक काझी यांच्या हस्ते चूल पेटवून अनोख्या पध्दतीने या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी शोएब भाई सय्यद, बाबासाहेब कापसे, विष्णू कांबळे, दीनानाथ काटकर, बालाजी डोईफोडे, पत्रकार संजय बारबोले, मोहसीन तांबोळी आदी मान्यवर तसेच बार्शी शहर व तालुक्यातील अनेक रोजगार इच्छुक युवक-युवती उपस्थित होते.


समाजाच्या सर्व घटकातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा हा मेळावा आयोजित करण्यामागील हेतू आहे असे आनंद काशीद प्रास्तविकात म्हणाले. 


सूत्रसंचालन विनायक घोडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक घोडके, विक्रम घायतिडक, शरद बाप्पा गुंड, मनोज शिंदे, हनुमंत करडे, अविनाश मोरे, रंजीत पाटील, अविनाश लोंढे, शोएब भाई सय्यद, विष्णु शिंदे, पांडुरंग घोलप आदींनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)