भाजी आणेर्यंत १५ मिनीटात मोटरसायकल गायब

Admin
0

 

Motorcycle stolen within 15 minutes of bringing vegetables

Motorcycle stolen within 15 minutes of bringing vegetables


बार्शी विशेष : भाजी घेऊन येईपर्यंत १५ मिनीटात मंडई समोर लावलेली मोटरसायकल चोरीला गेली. मोहन बिभीषण शिंदे (वय ३६) रा. येडाई विहीरजवळ, सुभाषनगर, बार्शी यांनी यासंदर्भात शहर पोलिसात तक्रार दिली आहे.


शिंदे भाजी घेण्यासाठी भोगेश्वरी मंदीराजवळील मंडईत सायंकाळी गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र.एमएच१३-डीसी-७२४१) भाजी मंडई समोर हँडल लॉक करुन लावली होती. भाजी घेऊन परत आल्यानंतर मोटरसायकल चोरीस गेल्याचे दिसून आले. २८ जून रोजी सायंकाळी ५.३५ ते ५.५० चे दरम्यान १५ मिनीटात ही चोरीची घटना घडली.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)