The bike was stolen from in front of the residence
बार्शी विशेष : राहत्या घरासमोर लावलेली दुचाकी रात्रीतून चोरीला गेली. याबद्दलची तक्रार पद्माकर भाऊसाहेब चोरमुले (वय ३८) रा. धस पिंपळगाव रस्ता, चोरमुले प्लॉट, बार्शी यांनी शहर पोलिसात दिली आहे.
मेव्हण्याच्या नावावर असलेली हिरो स्प्लेंडर प्रो मोटरसायकल (क्र. एमएच१३-एयू-२६३२) चोरमुले यांनी रात्री राहत्या घरासमोर हँडल लॉक करुन लावली होती. सकाळी ऊठून पाहिल्यानंतर ती चोरीला गेल्याचे आढळून आले. २७ जूनच्या रात्री साडेनऊ ते २८ जूनच्या सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली.
