Unseasonal rain accompanied by strong wind lashed Barshi
बार्शी विशेष : बार्शी शहर आणि परिसरात गुरुवार २३ मे रोजी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे झाडे पडली, घरावरील पत्रे उडाले यामुळे मोठे नुकसान झाले.
अशातच खंडित झालेला वीजपुरवठा शहरातील काही भागात मध्यरात्र उलटल्यानंतरही सुरु झालेला नव्हता. त्यामुळे प्रचंड उकाडा आणि डासांमुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले.
१) नाळे प्लॉट भागातील एका घरावर झाड पडले २) कोठारी बिल्डींग जवळील झाड तुटून उभ्या असलेल्या रिक्षावर पडले ३) होर्डिंग्जवरील बॅनर फाटून वीजेच्या तारांवर लटकले ४) लातूर रस्त्यावरील लक्ष्मी चाळीतील एका घरावर झाड पडले ५) सुभाषनगर भागातील सिनेमागृहाची दर्शनी सजावट उडून पडली ६ व ७) भोसले मळा परिसरातील घरावरील पत्रे उडाले, झाड तुटून पडले
