Tahsildar inspects damage caused by unseasonal rains
बार्शी विशेष : मागील आठवड्यात वादळी वा-यासह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यात विविध ठिकाणी पिके, फळबागा यासह घरांची आणि जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली.
बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी मौजे वैराग, उपळाई (ठो), वांगरवाडी येथे भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.
तसेच मौजे उपळाई (ठो), खांडवी व वांगरवाडी येथे पाणीपुरवठा करत असलेल्या सार्वजनिक विहीरींचीही तहसिलदारांनी पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, संबंधित तलाठी आदी उपस्थित होते.