बार्शी पंचायत समितीमधील 'लोकसेवक' लाच स्विकारताना सापडले

Admin
0
A 'public servant' in the Barshi Panchayat Samiti was found accepting bribes

A 'public servant' in the Barshi Panchayat Samiti was found accepting bribes

बार्शी विशेष : मंजूर झालेल्या वैद्यकीय उपचार निधीची रक्कम देण्यासाठी, तीन हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती दोन हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या बार्शी पंचायत समितीमधील तिघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. १) अविनाश देसाई, वय ५० (कनिष्ठ लिपिक प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग), २) बाबासाहेब सुभाष माने, वय ४० (सहाय्यक लेखाधिकारी पंचायत समिती, बार्शी) व ३) निखिल दत्तात्रय मांजरे, वय ३२ (कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर, पंचायत समिती, बार्शी) अशी या तिघांची नावे आहेत. 


याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२१ मध्ये तक्रारदाराना कोविड आजाराचा संसर्ग झाला होता, तसेच तक्रारदाराची आई पाय घसरून पडून डोक्यास मार लागला होता. सदर उपचाराचा खर्च तक्रारदार यांनी केला व त्यासाठी झालेल्या खर्चाचा निधी मिळण्याकरिता सन २०२१ मध्ये तक्रारदारांनी जिल्हा परिषद, सोलापूर यांच्याकडे अर्ज केला होता. सदरचा निधी मंजूर होऊन पंचायत समिती, बार्शी येथील अर्थ विभागाकडे बिल अदा करण्यासाठी निधी प्राप्त झाला होता. 


हा निधी तक्रारदारास देण्यासाठी लोकसेवक अविनाश अंकुश देसाई यांनी तक्रारदाराकडे बिल देण्यासाठी, बाबासाहेब माने यांचे नावे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर बाबासाहेब माने यांची पडताळणी केली असता, त्यांनीही बिल देण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. 


प्राप्त तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या प्रत्यक्ष सापळा कारवाईत बाबासाहेब माने यांचे सांगण्यावरून कंत्राटी कर्मचारी निखिल मांजरे लाच रक्कम स्वीकारताना पकडला गेला. त्यामुळे आरोपी क्र. दोन व तीन यांना ताब्यात घेऊन बार्शी शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, ७ (अ) व १२ प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ८ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आली.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरचे पो. नि. चंद्रकांत कोळी, सापळा पथक पोलीस अंमलदार पो. ना. संतोष नरोटे, पो. शि. गजानन किनगी, चालक हेडकॉन्स्टेबल राहुल गायकवाड  यांनी सदर कारवाई पार पाडली. 

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)