People are shocked by the power outage; Tahsildar's instructions to Mahavitaran
बार्शी विशेष : बार्शी शहर व ग्रामीण भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार शेख यांनी शहर व ग्रामीण विद्युत विभागाची तहसिल कार्यालयात बैठक घेतली.
नागरिकांच्या तक्रारी व वादळी वाऱ्यांसह होत असलेल्या अवकाळी पाऊसामुळे वारंवार खंडित होणारा विद्युतपुरवठा यासंदर्भात आढावा घेऊन नागरिकांच्या तक्रारीवर प्राधान्याने कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच क्षेत्रीय कर्मचारी पूर्णवेळ मुख्यालयात उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यास सांगितले.
बार्शी शहरासाठी आवश्यक नवीन सबस्टेशनसाठी जागेच्या उपलब्धतेबाबत माहिती घेऊन त्वरित जागा प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना तहसिलदारांनी यावेळी दिल्या.