चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जखमी

Admin
0

 

Two people were injured when a four-wheeler hit a two-wheeler

Two people were injured when a four-wheeler hit a two-wheeler

बार्शी विशेष : बार्शीतून गावाकडे परत चाललेल्या दुचाकीला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावरील एका हॉटेलसमोर घडली.  ज्ञानेश्वर गणपत गरदडे (वय ३५) रा. श्रीपतपिंपरी, ता. बार्शी यांनी कारचालकाविरुध्द फिर्याद दिल्यामुळे बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.


दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ चे सुमारास बार्शी येथून फिर्यादी व गावातील मित्राची मुलगी अमरजा दत्तात्रय गोरे (वय २२) मोटरसायकल (क्र.एमएच-२०-सीएल-७५४४) वरुन  श्रीपतपिंपरीकडे निघाले असता, हॉटेल श्रीप्रसाद जवळ आले त्यावेळी समोरुन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने मोटरसायकलला समोरुन धडक दिली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले. धडक दिलेल्या वाहनाचा (क्र.एमएच-०९-डी-२८३५) असल्याचे फिर्यादीने पाहिले. नंतर तेथे आलेल्या एका रिक्षाचालकाने त्या दोघांना बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले. 


चुकीच्या बाजूने वाहन चालवून धडक देऊन मोटरसायकलचे नुकसान होण्यास व दोघांना गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत झाल्याबद्दल अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुध्द तक्रार आहे असे फिर्यादीने दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)