One lakh rupees withdrawn from the bank by a farmer was stolen
बार्शी विशेष : पैसे काढल्याची नोंद खातेपुस्तकावर करुन घेईपर्यंत चोराने डाव साधून शेतकऱ्याने बँकेतून काढलेले लाख रुपये हातोहात लांबवले. बार्शीच्या शिवाजी नगर येथील बँकेत ही घटना घडली. येडबा अश्वमेध जाधव (वय ५३) रा. नागोबाची वाडी, ता. बार्शी यांनी शहर पोलिसात या घटनेची फिर्याद दिली आहे.
शेतातील मजूरांचे पगार करण्यासाठी जाधव यांनी युनिअन बँक ऑफ इंडियाच्या शिवाजी नगर शाखेतून बचत खात्यावर जमा असलेले एक लाख रुपये काढले. कॅशिअरकडून मिळालेल्या ५०० रुपयांच्या २०० नोटा त्यांनी हातातील पिशवीत ठेवल्या. पैसे काढल्याची नोंद करुन खातेपुस्तक हातातील पिशवीत ठेवत असताना पिशवीमध्ये ठेवलेले एक लाख रुपये नसल्याचे आणि पिशवी एका बाजूला कापल्याचे त्यांना दिसून आले. २३ जानेवारी रोजी सकाळी साडेदहाचे सुमारास ही घटना घडली. शहर पोलिस ठाण्यात अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
