तंबाखू देण्यास नकार; ब्लेडने केले वार

Admin
0

 

Blade stabbed up due to not being given tobacco to eat

Blade stabbed up due to not being given tobacco to eat

बार्शी विशेष : तंबाखू खाण्यास मागितली असता नाही म्हणाल्यामुळे लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन चेहऱ्यावर ब्लेडने वार केल्याची घटना बार्शीतील तेलगिरणी चौकात घडली. उपचाराधीन असलेले नारायण प्रभाकर पवार रा. खासापुरी, ता. परांडा यांनी  इस्पितळातून एमएलसी द्वारे फिर्यादी जबाब दिला आहे. 

जबाबानुसार, २४ जानेवारी रोजी मावस भाऊ जयराम तनपुरे यांच्यासह फिर्यादी बार्शी येथे कामानिमित्त मोटरसायकलवरुन आले होते. रात्री दहाचे सुमारास गावाकडे परत जाताना, तेलगिरणी चौकात मोटरसायकल थांबवून फिर्यादीचे मावस भाऊ पाण्याची बाटली आणण्यासाठी जवळच्या पानटपरीकडे गेले. 

त्यावेळी मोटरसायकलजवळ एकटेच उभ्या असलेल्या फिर्यादीजवळ एका तरुणाने येवून खाण्यासाठी तंबाखू मागितली. माझ्याकडे तंबाखू नाही असे फिर्यादीने सांगताच त्या तरुणाने शिवीगाळी करत ढकलून खाली पाडले. त्याचवेळी इतर तिघांनी येवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, व एकाने खिशातून ब्लेड काढून चेहऱ्यावर वार करुन जखमी केले. आरडाओरडा ऐकून पानटपरी मालकाने जोरात आवाज देताच ते चौघे पळून गेले.

ब्लेडने वार करणाऱ्याचे नाव हितेश कांबळे रा. बार्शी व इतर तिघे अनोळखी असल्याचे फिर्यादीस तेथे समजले. त्यानंतर मावस भावाने जगदाळे मामा हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असे जबाबात नमूद केले आहे. शहर पोलिसांनी चौघा विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल माने करत आहेत.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)