दोन परप्रांतीय अल्पवयीन मुलींची वेश्यालयातून सुटका; बार्शी शहर पोलिसांची कारवाई

Admin
0

 

Rescue of two migrant minors from a brothel; Barshi city police took action

Rescue of two migrant minors from a brothel; Barshi city police took action

बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिसांनी दोन परप्रांतीय अल्पवयीन मुलींसह अन्य सहा महिलांची वेश्यालयातून सुटका केली. मंगळवार दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही सुटकेची कारवाई करण्यात आली.

बार्शी शहर पो.नि. संतोष गिरीगोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या तेल गिरणी चौकातील गल्लीमध्ये देहव्यापार करण्यासाठी काही अल्पवयीन मुलींना आणले आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन तपास केला असता, परराज्यातून देहव्यापारासाठी आणलेल्या दोन अल्पवयीन मुली तसेच कमी अधिक वयाच्या सहा महिला तेथील वेश्यालयात आढळून आल्या. 

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्या दोन अल्पवयीन मुलींची रवानगी बालसुधारगृहात केली आणि इतर सहा महिलांना वय निर्धारण तपासणीसाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पीटल येथे पाठविले. यासंदर्भात पोलिसांनी बायडाबाई लखपती नावाच्या महिलेला अटक करुन तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

ही कारवाई बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्यालयातील पथक व गैर सरकारी संस्थेच्या पथकासह पो.नि. संतोष गिरीगोसावी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी, महिला पोलिस अंमलदार यांनी केली.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)