‘आला बैलगाडा’ गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं : डॉ. अमोल कोल्हे

Admin
0

 

Seeing the song 'Aala Bailgada' brought tears to my eyes: Dr. Amol Kolhe

Seeing the song 'Aala Bailgada' brought tears to my eyes: Dr. Amol Kolhe

बार्शी विशेष (मुंबई) : आला बैलगाडा हे गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं असे भावूक उद्गार खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी बिग हिट मिडीया प्रस्तुत ‘आला बैलगाडा’ गाण्याच्या अनावरण सोहळा प्रसंगी बोलताना काढले. हा सोहळा खा. डॉ. अमोल कोल्हे, डिजीटल मि़डीया जर्नलिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गायक आनंद शिंदे, उद्योजक संतोष ठोंबरे, कृष्णा पंड्या तसेच मराठी, हिंदी चित्रपट गोष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत संपन्न झाला.

पुढे बोलताना खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, २०१९ ला लोकसभेत निवडून गेल्यावर, संसदेत बोलायला उभं राहिलो की, थट्टेनं बाकीचे खासदार बोलायचे बैलगाडा की शिवाजी महाराज? हे केवळ मनोरंजन नाही, ही ४०० वर्षांची परंपरा आहे, हे सर्व सामान्य शेतक-यांचं मनोरंजन आहे. यामुळे ग्रामीण रोजगाराला चालना मिळते. कारण २ हजार उंब-याच्या गावात जेव्हा ४ ते ५ हजार लोक येतात. तेव्हा तेथील इकॉनॉमीला चालना मिळते. गोडी शेव, भेळ या सर्वांना रोजगार उपलब्ध होतो, त्याचबरोबर पर्यटनाला देखील चालना मिळते.

पांड्या सरांना उद्देशून ते म्हणाले, आमचं मोठं स्वप्न आहे की जर स्पेनची इकॉनॉमी बुलरन आणि स्पॅनिश बुल फाइट वर चालू शकते. तर आपण पण आंतरराष्ट्रीय टुरीझम आपल्या ‘बौलगाडा’साठी करू शकतो. बिग हिट मि़डीयाचे निर्माते हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट आणि संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. कारण मुलं एखादं स्वप्न पाहतात आणि पालक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतात. ते अस्तित्वात येतं. तुम्ही अश्या विषयाला निवडलं आहे जो विषय फार महत्वाचा आहे. आपल्या भारतामध्ये अनेक परंपरा आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. पण त्याचं कल्चरल नरेटीव्ह करायला आपण कुठे तरी कमी पडत असतो. पण तुम्ही या गाण्यातून ते योग्यपणे मांडलय.

गाणं एकदम नादखुळा झाल आहे. बिग हिट मिडीयाने हा विषय निवडला त्यासाठी तुमचं कौतुक. तुमच्या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळो यासाठी शुभेच्छा! अशा शब्दात खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी संगीतकार प्रशांत नाकतींना शुभेच्छा दिल्या.

आला बैलगाडा हे गाणे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि सुमधूर गळ्याची गायिका सोनाली सोनावणे यांनी गायले असून मिलिनिअर संगीतकार प्रशांत नाकती यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी या संगीत अनावरण सोहळ्याला विशेष हजेरी लावली होती. 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)