हिंदवी परिवाराची जिंजी किल्ला मोहीम यशस्वी; दहा मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान

Admin
0

 

Jinji fort campaign of Hindavi Parivar successful; Ten dignitaries honored with awards

Jinji Fort campaign of Hindavi Parivar successful; Ten dignitaries honored with awards

बार्शी विशेष (मुंबई) : हिंदवी परिवार संस्थेच्या ३०० शिवभक्तांनी तामिळनाडू राज्यातील चेन्नई परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिंजी किल्यावर जावून दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी केली. या किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्रातील दहा मान्यवरांना पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते सह्याद्री भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. 

गेल्या दोन दशकांपासून हिंदवी परिवार संघटना दरवर्षी गडकोट पदभ्रमंती मोहिमांचे आयोजन करत असते. यंदा ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा शिव व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथील स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी किल्ला तसेच साजीरा-गोजीरा किल्ला, वेल्लोर किल्ला, बृहदेश्वर मंदिर तंजावर पॅलेस, सरस्वती महाल आदी ठिकाणी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचे नियोजन डॉ. संभाजी भोसले आणि कार्याध्यक्ष अमोल मोहिते यांनी केले.

या पदभ्रमंती मोहिमेत भूषण बापट, हितेश डफ, दिलीप मेसरे, विठ्ठल इंगळे, संतोष शेटे, धारेश्वर तोडकरी, नितीन सुकरे, डॉ. स्वरूप पाटील, वसंत झावरे, शंभू लेंगरे, अर्चना शिंदे, महेश शिंदे, डॉ. अभिषेक गांधी, संभाजी जाधव, गौतम गांधी, लता धामणे, अमृत काटकर, पद्मिनी गावंडे आदींनी परिश्रम घेतले.



🔴 जिंजीच्या पायथ्याशी मान्यवरांचा सन्मान 


जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर, दै. नवशक्ती व फ्री प्रेस जर्नल चे समूह राजकीय संपादक राजा माने, राष्ट्रीय आयुर्वेद गुरू डॉ. रामदास आव्हाड, वेल्लोर येथील सामाजिक कार्यकर्ते बळवंत जगदाळे, जिल्हाधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना (सह्याद्री जीवनगौरव), चित्रकार नितीन खिलारे, वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे व डॉ. सौ. नयना बच्चुभाऊ कडू यांना (सह्याद्रीभूषण), गडकन्या हमीदाखान यांना (सह्याद्रीभ्रमंतीभूषण) तर डॉ. यशवंत राजे भोसले यांना (सह्याद्रीशौर्य) पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच तंजावर गादीचे छत्रपती व्यंकोजीराजे यांचे १४ वे वंशज आबाजी राजे भोसले व राणीसाहेब यांचा विशेष मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

🔴 छत्रपतींच्या नामोल्लेख असलेल्या फलकाचे अनावरण 


या मोहिमेत जिंजी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचा नामोल्लेख असलेला फलक लावून पोलिस उपायुक्त शेखर देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण करण्यात आले.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)