सहा महिन्यात पैसे दुप्पट करुन देण्याच्या आमिषाने बार्शीतील महिलेला ११ लाखाचा गंडा

Admin
0

 

A woman from Barshi was cheated for 11 lakhs for the lure of doubling the money in six months

A woman from Barshi was cheated for 11 lakhs for the lure of doubling the money in six months

बार्शी विशेष : शेअर बाजारात पैसे गुंतवून सहा महिन्यात दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून घेतलेले अकरा लाख रुपये आणि नातेवाईकाच्या लग्नासाठी मागून घेतलेले ३ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने परत न करता १४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सुनिता विश्वनाथ कोकाटे (वय ४०) रा. गाडेगाव रोड, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची सुलताना निजाम शेख (रा. ताडसौंदणे रोड, संतोषी माता चौक, बार्शी) हिचेशी २०१६ पासून कामानिमित्त ओळख झालेली होती. सुलताना, तिची आई व मुलगा यांचे एकमेकांच्या घरी जाणेयेणे असल्यामुळे विश्वासाचे संबंध निर्माण झाले होते. याच विश्वासातून सुलतानाने पुण्यातील नातेवाईकडून शेअर बाजारात पैसे गुंतवून सहा महिन्यात दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखविले.

त्यावर विश्वास ठेवून सुनिता कोकाटे यांनी कारी येथील शेतजमीन, बार्शीतील प्लॉट विक्री करुन आलेली आणि मुलाच्या एलआयसीची मिळालेली रक्कम मिळून ७ लाख रुपये ऑनलाईन व ४ लाख रुपये रोख असे मिळून अकरा लाख रुपये ७ फेब्रुवारी ते ७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सुलताना शेख कडे दिले. तसेच १५ सप्टेंबर रोजी सुलतानाने नातेवाईकाच्या लग्नासाठी ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या व  ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण लग्न झाल्यावर परत करते असे सांगून मागितल्यामुळे दिले.

पुढे सदरची रक्कम आणि सोन्याचे दागिने वारंवार मागणी करुनही परत दिले नाहीत, तसेच नोटरी करुन फेडरल बँकेतील बंद केलेल्या खात्याचा धनादेश दिला. यामुळे आपली १४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाली अशी तक्रार सुनिता कोकाटे यांनी दिली.

या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी सुलताना निजाम शेख व तिचा पुणे येथील नातेवाईक (नाव माहित नाही) यांचेविरोधात  गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार करत आहेत.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)