बार्शी विशेष : बार्शी येथील सुलाखे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १४, १७ व १९ वयोगटातील मुला मुलींच्या शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयाने घवघवीत यश मिळविले. शनिवार दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
सदर स्पर्धांमध्ये तालुक्यातील २४८ खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्र विद्यालयाच्या वयोगट १४ मुली मध्ये चौथा क्रमांक वेदिका विलास घोळवे तर पाचवा क्रमांक सृष्टी दत्तात्रय पाटील, वयोगट १४ मुलांमध्ये दुसरा क्रमांक प्रज्ज्वल प्रताप शिंदे तर तिसरा क्रमांक उदयांनद सोमनाथ दळवी, वयोगट १७ मुलांमध्ये प्रथम क्रमांक आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त प्रसन्न विद्याधर जगदाळे तर चौथा क्रमांक समर्थ बालाजी नवले, वयोगट १९ मुलींमध्ये चौथा क्रमांक समृद्धी विलास कुलकर्णी व वयोगट १९ मुलांमध्ये द्वितीय क्रमांक अनिकेत मारुती दळवी, तृतीय क्रमांक वेदांत सचिन मस्के तर चौथा क्रमांक वेदांत अनिल खोसे अशा एकूण १० खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली.
या स्पर्धेसाठी आरबिटर पंच म्हणून सोलापूर येथील उदय वगरे यांनी काम पहिले. संघ व्यवस्थापक म्हणून अतुल नलगे यांनी काम पाहिले तर क्रीडा शिक्षक अनिल पाटील, पी. डी पाटील, योगेश उपळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, संस्था सदस्य बी. के. भालके, सर्व कार्यकारिणी व संस्था सदस्य, महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती के. डी. धावणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
