बार्शी विशेष : दि. १ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या महसूल सप्ताहांतर्गत आजी-माजी सैनिक, वीर नारी व सैनिक कुटुंबियांसाठी 'सैनिक हो तुमच्यासाठी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी स्वागत केले.
यावेळी 'सैनिक हो तुमच्यासाठी' या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व आजी-माजी सैनिक, वीर नारी व सैनिक कुटुंबियांनी मांडलेल्या विविध विभागांच्या समस्येबाबत तहसिलदारांनी त्यांच्याशी चर्चा करुन समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी तहसिल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमासाठी बार्शी तालुका माजी सैनिक संघटना अध्यक्ष चांगदेव सुरवसे, सचिव शेख व बहुसंख्य माजी सैनिक तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारीवृंद उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळ अधिकारी खांडवी शरद शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बदे सुभाष, निवासी नायब तहसिलदार, काझी ए. डब्लु. महसूल नायब तहसिलदार, मुंढे संजीवन निवडणूक नायब तहसिलदार, कोरके प्रताप मंडळ अधिकारी बार्शी यांनी परिश्रम घेतले.
