पानगांवजवळ झालेल्या दोन मोटरसायकलच्या धडकेत दोघे जागीच ठार

Admin
0

 

Two motorbikes collided near Pangaon, killing two on the spot

बार्शी विशेष : बार्शी सोलापूर रस्त्यावरील पानगांवजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात दि. १० मार्च २०२३ च्या रात्री अकराच्या सुमारास झाला. करण उर्फ शिवम राजेश वडेकर (वय २५) रा. भवानी पेठ, बार्शी व बाबू कांतू राठोड (वय ५०) रा. गुळवंची तांडा, ता. उत्तर सोलापूर अशी मयतांची नावे आहेत.

बार्शी सोलापूर रस्त्यावरील पानगांव येथे असलेल्या खोमणे चहा कँटीनसमोर हा अपघात झाला. शिवम वडेकर हे त्यांच्या मोटरसायकलवरुन (क्र.एमएच-१३-डीडब्ल्यू-९९३०) वैरागकडून बार्शीकडे जात होते. तर  बाबू कांतू राठोड हे त्यांच्या मोटरसायकल (क्र.एमएच-१३-बीटी-५८२४) वरुन बार्शीकडून येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघांचाही जागीच मृत्यु झाला.

ही धडक इतकी जोरदार होती की, दोघांचेही शव मोटरसायकलपासून ७ फूट अंतरावर पडलेले होते.

बार्शी तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)