बार्शी विशेष : बार्शीत इयत्ता १० वीत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी रात्रीतून बेपत्ता झाल्याची घटना घडली. रात्री दहा वाजता जेवण झाल्यानंतर ही मुलगी कुटुंबातील सर्वांसह झोपी गेली. रात्री दोनच्या सुमारास जाग आल्यामुळे तिची आई उठली असता, शेजारी झोपी गेलेली मुलगी दिसून आली नाही. तेव्हा कुटुंबातील सर्वांनी उठवून सगळ्यांनी तिचा आसपास, नातेवाईकांकडे तसेच सर्वत्र शोध घेतला, तरीही ती मिळून आली नाही. त्यामुळे तिला अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरुन पळवून नेल्याचा संशय व्यक्त करुन तिच्या आईने बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. ११ मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
१० वीत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी बार्शीतून बेपत्ता
मार्च ११, २०२३
0
