माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून विषारी औषध टाकून मारहाण

Admin
0

 

Beating with poisonous drug in anger for applying RTI

बार्शी विशेष : माहिती अधिकाराचा अर्ज का केला म्हणून विषारी औषध टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना बार्शी तालुक्यातील मळेगांव येथे घडली. याची फिर्याद नवाज सलीम मुलाणी (वय २७) रा. मळेगाव, ता. बार्शी यांनी पांगरी पोलिसात दिली आहे.

फिर्यादीने सौंदरे, ता. बार्शी येथील जि.प.प्रा.शाळेची अंतर्गत माहिती मिळण्यासाठी गट शिक्षण अधिकारी, बार्शी यांचेकडे माहिती अधिकाराचा अर्ज केला होता. 

दि. ७ मार्च रोजी रात्री आठचे सुमारास फिर्यादी गावातील रस्त्यावरुन जात असताना, शकूर उर्फ पापा रहिम बागवान, रहिम चाँदसाब बागवान, हसन रहिम बागवान, अमजद मैनुद्दीन शेख, मोहसीन मैनुद्दीन शेख, खानसाब तांबोळी (सर्व रा. मळेगाव, ता. बार्शी) या सर्वांनी माहिती अधिकाराचा अर्ज का करतो म्हणून, बाटलीतील विषारी औषध तोंडावर टाकून, वीट, पाईप, रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. भांडण सोडविण्यास आलेल्या फिर्यादीच्या आई वडिलांनाही मारहाण करुन ढकलून दिले. असे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीवर ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)