बार्शी शहर पोलिसांनी दुचाकी चोर पकडला; जप्त केलेल्या २५ दुचाकीत बार्शीतील ७

Admin
0

 

Barshi city police nabs two-wheeler thief; Out of 25 seized bikes, 7 from Barshi

बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिसांनी एका दुचाकी चोराला ताब्यात घेऊन त्याचेकडून सुमारे ८ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या २५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. जप्त केलेल्या २५ दुचाकी मध्ये बार्शी शहरातील गु.र.नं.१०/२३, ४५/२३, १४४/२३, १६०/२३, २१६/२३, २२२/२३ व २४१/२३ या ७ दुचाकींचा समावेश आहे.

सत्यवान रामहरी भोसले (सिरसट) रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर हा इसम, स्वतःची ओळख पटू नये यासाठी हेल्मेट घालून मागील काही दिवसांपासून बार्शी शहरातून दुचाकी चोरत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. तो चोरी करण्यासाठी बार्शीत येणार असल्याची बातमी गोपनीय बातमीदारांकडून मिळाल्याने, त्याच्यावर पाळत ठेवून, तो तेलगिरणी चौकात मोटरसायकलपरुन येताच, त्याला पकडून त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकलची चौकशी केली, तेव्हा त्याने ती बार्शी बस स्थानकातून चोल्याचे सांगितले. 

त्याला अटक करुन पोलिस रिमांड घेऊन चौकशी केली तेव्हा, त्याने बार्शी शहर, टेंभुर्णी, पंढरपूर शहर, सोलापूर तालुका व शहर तसेच नळदुर्ग, धाराशिव येथून दुचाकी चोरल्याचे केल्याचे कबुल केले. त्याचेकडून आणखीही दुचाकी मिळण्याची शक्यता आहे.

  • ओळख लपविण्यासाठी हेल्मेट घालून चोरी करायचा
  • फायनान्स कंपनीत रिकव्हरी अधिकारी असून माझ्याकडे स्क्रॅप विभाग आहे असे सांगत असे
  • स्क्रॅपमधील गाडी असल्यामुळे कागदपत्रे नाहीत पण फायनान्सचे पत्र देतो सांगून करायचा विक्री
  • स्क्रॅपमधील दुचाकी विकण्याबाबत व्हॉटसअपवर स्टेटस ठेवायचा

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि सुधीर तोरडमल, सपोउनी अजित वरपे, शैलेश चौगुले, मनिष पवार, अमोल माने, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, अंकुश जाधव, अर्जुन गोसावी, सचिन देशमुख, अविनाश पवार, रवि लगदिवे, रतन जाधव यांनी केली.

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

  • कागदपत्राशिवाय जुने वाहन खरेदी करु नका. तसे करताना कोणी आढळल्यास पोलिसांना कळवा.
  • दुचाकी पार्किंग करताना हँडल लॉक करुन शक्यतो सीसीटीव्हीच्या कक्षेत पार्क करा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)