बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिसांनी एक दुचाकी चोर पकडून त्याचेकडून २५ दुचाकी जप्त केल्या. त्यामध्ये बार्शी शहरातून चोरीस गेलेल्या सात दुचाकींचा समावेश आहे. ही बातमी प्रसिध्द होऊन काही तास उलटले नाहीत तोपर्यंत शहर पोलिस ठाण्यात अजून सहा म्हणजे अर्धा डझन दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दुचाकी चोर पकडल्याचा बार्शीकरांना झालेला आनंद फार काळ टिकला नाही असेच म्हणावे लागेल.
पहिल्या घटनेत, राहत्या घराच्या गेटसमोर लावलेली मोटरसायकल (क्र.एमएच-२५-के-२६५९) चोरीला गेल्याची तक्रार विजयानंद दत्तात्रय सांगडे ( वय ४७) रा. मुसळे प्लॉट, गाडेगाव बार्शी यांनी दिली आहे. ही घटना दि. २३ मार्च २०२३ च्या रात्री ९.३० ते ९.४५ चे दरम्यान घडली.
दुसऱ्या घटनेत, सोलापूर रोड येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानाच्या गेट समोर, हँडल लॉक करुन लावलेली मोटरसायकल (क्र.एमएच-१०-बीपी-५७५६) चोरीला गेल्याची तक्रार प्रमोद बबन बांडे (वय ३५) रा. शिवतीर्थ नगर, कासारवाडी रोड, बार्शी यांनी दिली आहे. ही घटना दि. २५ मार्च २०२३ च्या रात्री ८.०९ ते ९ चे दरम्यान घडली.
तिसऱ्या घटनेत, राहत्या घरासमोर लावलेली मोटरसायकल (क्र.एमएच-१३-डीजे-६८५६) चोरीला गेल्याची तक्रार अभिषेक सुर्यकांत पंपट ( वय ३५) रा. बुरूड गल्ली, बार्शी यांनी दिली आहे. ही घटना दि. २५ मार्च २०२३ च्या रात्री १० ते पहाटे ४.३० चे दरम्यान घडली.
चौथ्या घटनेत, बार्शीच्या पांडे चौकातील कलर्सच्या दुकानासमोर हँडल लॉक करुन लावलेली मोटरसायकल (क्र.एमएच-१३-डीए-०२६५) कपडे खरेदी करुन येईपर्यंत चोरीला गेल्याची तक्रार मोसीन मुबारक तांबोळी (वय २७) रा. बारंगुळे प्लॉट, बार्शी यांनी दिली आहे. ही घटना दि. १५ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ चे दरम्यान घडली.
पाचव्या घटनेत, अध्यापक कॉलनीतून राहत्या घरासमोर हँडल लॉक करुन लावलेली मोटरसायकल (क्र.एमएच-१३-सीवाय-५८८९) चोरीला गेल्याची तक्रार हेमंत लहु लांडे (वय २६) रा. अध्यापक कॉलनी, सातपुते हॉस्पिटल जवळ, बार्शी यांनी दिली आहे. ही घटना दि. २७ मार्च २०२३ रोजी रात्री ९.३० ते पहाटे ४ चे दरम्यान घडली.
सहाव्या घटनेत, सेंट्रींग कामगाराने विठ्ठलनगर येथील बांधकामावर हँडल लॉक करुन लावलेली मोटरसायकल (क्र.एमएच-१३-डीए-९८१०) चोरीला गेल्याची तक्रार कृष्णा रामा होटकर (वय २८) रा. ढोर गल्ली, मंगळवार पेठ, बार्शी यांनी दिली आहे. ही घटना दि. २५ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ चे दरम्यान घडली.
