बार्शी शहरात पिकअपसह लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त

Admin
0

 

Gutkha worth lakhs of rupees seized along with pickup in Barshi city

बार्शी विशेष : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनासह ११,६९,००० रुपयांचा गुटखा बार्शी शहर पोलिसांनी जप्त केला आहे.

शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शहरातील बालाजी कॉलनी, सोलापूर रोड येथे सापळा लावून तेथे आलेल्या पिकअप (क्र.एमएच-४३-एडी-९७८८) ची तपासणी केली असता, २० पोत्यामध्ये भरलेले सुगंधित राजनिवास पान मसाल्याचे ४००० पुडे (७,६९,००० रुपये किंमतीचे) आढळून आले. 

वाहन चालक अशपाक जवाहर अत्तार (वय ३०) रा. मालवंडी, ता. बार्शी याच्याकडे त्याबाबत चौकशी केली असता, तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही, त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांना कळवून आरोपीविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. १८६० कलम १८८स २७२, २७३, ३२८ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनिय २००६ कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार करत आहेत. ही कारवाई दि. १९ मार्च २०२३ रोजी करण्यात आली.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि सुधीर तोरडमल, सपोउनी अजित वरपे, रेवणनाथ भोंग, शैलेश चौगुले, मनिष पवार, अमोल माने, वैभव ठेंगल, संदेश पवार, ज्ञानेश्वर घोंगडे, अंकुश जाधव, अर्जुन गोसावी, सचिन देशमुख, अविनाश पवार, रवि लगदिवे, रतन जाधव यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)