शेतातील कृषी उपयोगी साहित्य चोरून नेले; मळेगांव येथील घटना

Admin
0

 

Steal agricultural implements from the fields; Incident at Malegaon

बार्शी विशेष :  शेतातील सोयाबीन, पंप, बियाणे आदी कृषी उपयोगी साहित्य चोरीला गेल्याची घटना तालुक्यातील मळेगांव येथे घडली. याची फिर्याद नसीर बशीर शेख (वय ५३) रा. मळेगांव, ता. बार्शी यांनी पांगरी पोलिसात दिली आहे.

मळेगांव, ता. बार्शी येथील शेख यांच्या शेतात असलेल्या खोलीसमोरील पत्रा शेडला लोखंडी जाळी व गेट लावलेले असून, त्यामध्ये कृषीउपयोगी साहित्य ठेवलेले असते.

दि. १० फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास शेतातील गेटचे कुलूप उघडून शेडमध्ये गेल्यानंतर, शेख यांना आतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. खोलीमध्ये जाऊन पाहणी केली तेव्हा, मळणी करून ठेवलेले सोयाबीनचे तीन कट्टे, पेरणीसाठी आणून ठेवलेल्या सोयाबीनच्या तीन पिशव्या, सबमर्सिबल पंप, ताडपत्री, कुऱ्हाड असे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले.

नसीर शेख यांनी ३२ हजार ९०० रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद दिल्यावरून, पांगरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरूध्द गुन्हा नोद झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)