बार्शी विशेष : घरासमोर लावलेला ९० हजार रुपये किंमतीचा दोस्त टेंपो भरदिवसा चोरीला गेल्याची घटना बार्शी तालुक्यातील सुर्डी येथे घडली. याबाबतची फिर्याद तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
फिर्यादीच्या घरासमोर लावलेला सकाळी ७ वाजता पाहिले तेव्हा उभा असलेला अशोक लेलँड कंपनीचा दोस्त टेंपो (क्र. एमएच-१४-सीपी-९२३९) दुपारी तीनच्या सुमारास तेथे दिसून येत नसल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आजूबाजूला विचारपूस करून तसेच फोनवर सर्वत्र चौकशी करूनही ठावठिकाणा न लागल्याने टेंपो चोरीला गेल्याची त्यांची खात्री पटली.
याबाबत अजय बाळू शिंदे (वय २९) रा. सुर्डी, ता. बार्शी यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ चे दरम्यान घडली.
