शालेय विद्यार्थीनीशी अश्लील संभाषण करणाऱ्या बार्शीतील शिक्षकाला अटक

Admin
0

teacher in Barshi arrested for having an obscene conversation with a schoolgirl

teacher in Barshi arrested for having an obscene conversation with a schoolgirl

बार्शी विशेष : शालेय विद्यार्थीनीशी मोबाईलवरुन अश्लील संभाषण करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या बार्शीतील  शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

शाळेतील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीशी सोशल मिडीया अॅपच्या माध्यमातून या शिक्षकाने २० डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान वेळोवेळी अश्लिल संदेश पाठवून संभाषण करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच पीडीतेने लव्हशीप करावी यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. शिक्षक असल्याकारणाने पीडीत मुलीने त्याकडे दुर्लक्ष करून प्रत्युत्तर देणे टाळले. त्यानंतर त्याने धमकी देणारा संदेश पाठविल्यामुळे मात्र पीडीत मुलीने घाबरून जाऊन सदर प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला.

बार्शी शहर पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीवरून या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून, बार्शी न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)