![]() |
बार्शी विशेष : महाराष्ट्र शासनाच्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडून डि.पी.डि.सी.योजना सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२२-२०२३ अंतर्गत बार्शी तालुक्यातील यावली, खांडवी, उपळे दुमाला, जामगांव (पा), श्रीपत पिंपरी, आगळगांव, खडकलगांव, ढोराळे, शेळगांव (आर), शिराळे, सुर्डी, घारी, गोरमाळे, धामणगांव, कव्हे, भानसळे, अलिपूर, पांगरी, ममदापूर, मानेगांव, वालवड, फपाळवाडी, घाणेगांव, चारे, जामगांव(आ), उक्कडगांव, कांदलगाव, नागोबाचीवाडी, बावी, बाभुळगांव, कासारवाडी, भोयरे, शेलगांव, पांढरी, उपळाई ठोंगे, व्हळे, मानेगांव, तांबेवाडी, उंडेगाव, पिंपळवाडी, कारी, घाणेगांव, सासुरे, सौंदरे, काटेगांव, ताडसौंदणे, तुर्क पिंपरी आदी गावातील विद्युत डिपी बसविणे,इतरत्र हलविणे,दुरुस्ती करणे यासाठी ३ कोटी ५७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पार पडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीच्या विकासासाठी आजपर्यंत विविध योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे.
