![]() |
बार्शी विशेष : तुम्ही आम्हाला नेहमी शिव्या का देता म्हणत शेजारी राहणाऱ्या चौघांनी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अशी फिर्याद माया रमेश धोत्रे (वय ४०) रा. सुभाषनगर, मारूती मंदीराजवळ, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसात दिली आहे.
काही दिवसांपूर्वी शेजारी राहाणाऱ्या मुद्दे यांच्याशी झालेला वाद माझ्या भावाने मिटविला होता. दि. ८ जानेवारी रोजी रात्री साडेनऊचे सुमारास आमच्या कुटुंबात घरगुती स्वरुपाचा वाद सुरू असताना, शेजारी राहणाऱ्या नरेंद्र मुद्दे, अनिता नरेंद्र मुद्दे, अतुल नरेंद्र मुद्दे व सोन्या नरेंद्र मुद्दे या चौघांनी तुम्ही आम्हाला नेहमी शिव्या का देता म्हणून लाथाबुक्क्यांनी व पाईपने मारहाण करून तुम्हाला बघून घेतो म्हणून वीट फेकून मारली. त्यामुळे माझ्या डोक्यास व माझा मुलगा उमेशच्या हाताच्या बोटास लागून जखमी केले, असे माया धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
