सिगारेट देण्यास नकार दिल्याने दोन भावांना मारहाण बार्शीतील घटना

Admin
0

 

Two brothers beaten up for refusing to give cigarettes incident in Barshi

Two brothers beaten up for refusing to give cigarettes incident in Barshi

बार्शी विशेष : दुकान बंद करत असताना सिगारेट मागितल्यावर सिगारेट विकत नाही म्हणून नकार दिल्यामुळे दोन भावांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. याबाबतची फिर्याद कुंदन रामकुमार शर्मा (वय २०) रा. सन्नी सैदपूर, मुज्जफुरा, पटणा (हल्ली मंगळवार पेठ, मावळा ग्रुप, बार्शी) यांनी दिली आहे.

शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माझे भगवंत मंदिराजवळ पूजा साहित्य विक्रीचे दुकान आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता मी दुकान बंद करत असताना अभि, कांचा, प्रेम (सर्व रा. भीमनगर, बार्शी) व इतर चार अनोळखी इसमांनी मी त्यांना सिगारेट दिली नाही या कारणावरुन मला शिवीगाळी करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली व माझा भाऊ चंदन भांडण सोडविण्यास आला त्यालाही लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत माझ्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन तुटून गहाळ झाली. जाताना माझा मोबाईल तसेच माझ्या दुकानातील गल्ल्यात ठेवलेले ४ हजार रुपये जबरदस्तीने घेऊन गेले.

सदर फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)