![]() |
बार्शी विशेष : मंडईमधून भाजी घेऊन येईपर्यंत दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार घडला. संदिप काशीबा माळी (वय २२) रा. सुर्डी, ता. बार्शी यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलिसांत दिली आहे.
दि. ३१ डिसेंबर रोजी संदिप माळी कामानिमित्त बार्शीमध्ये आले होते. त्यावेळी सायंकाळी साडेपाचचे सुमारास शहरातील भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गेले. जातेवेळी त्यांनी त्यांची मोटरसायकल अग्निशमन केंद्राच्या समोरील पटांगणात हँडल लॉक करुन लावली होती. थोड्या वेळात भाजी खरेदी करुन मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी परत आल्यानंतर मोटरसायकल तेथे दिसून आली नाही. तसेच सर्वत्र शोध घेऊनही सापडली नाही. त्यामुळे बार्शी शहर पोलिस ठाण्यात त्यांनी चोरीची फिर्याद दिली आहे.
