![]() |
पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी
बार्शी विशेष : एटीएममध्ये जाणा-या नागरीकांना बोलण्यात गुंतवून, त्यांचेजवळील एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून रकमेस गंडा घालण्याच्या तकारींचे प्रमाण ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर परीसरात वाढले होते.
पोलीस आयुक्तालय ठाणे शहर व सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा तपशीलाच्या आधारे तांत्रिक तपास करून, याप्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढत असताना, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी शाखा यांना पाहीजे असलेले आरोपी सनी उर्फ विकण्या मुन्ना सिंग (वय २७) रा. नेहरूनगर, विठ्ठलवाडी, कल्याण पूर्व, जि.ठाणे (मूळ रा. जि. कानपूर, उत्तरप्रदेश) व श्रीकांत प्रकाश गोडबोले (वय २८) रा. भैयासाहेब आंबेडकर नगर, खेमाणी, उल्हासनगर नं. २, जि. ठाणे हे दोघे पंढरपूर शहरात आहेत अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश कावळे, खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर यांना मिळाली.
त्यांनी तत्काळ पंढरपूर शहर पोलीसांशी संपर्क साधून सदर आरोपीबाबत माहिती कळविली. त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीसांनी तातडीने दोन पथके तयार करून, आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत, सिनेस्टाईलने या दोन आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांचेकडे वेगवेगळ्या बॅंकांचे एकूण १०१ एटीएम कार्ड मिळून आले. अधिक चौकशीमध्ये त्यांनी यापूर्वी ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे, नाशिक, पंढरपूर या हद्दीत गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. सदरचे आरोपींना पंढरपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कार्यवाहीसाठी खंडणी विरोधी शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय यांचेकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, विकम कदम,उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर, अरूण फुगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत,पोना प्रसाद औटी,पोना समाधान पाटील,पोशि माधव वड्डेटीवार, पोशि निलेश कांबळे, चालक पोशि रामकिसन खेडकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोशि अन्वर आत्तार तसेच खंडणी विरोधी शाखा, ठाणे शहर यांचेकडील पोलीस उपनिरीक्षक महेश कावळे यांनी पार पाडली. पुढील तपास खंडणी विरोधी शाखा,पोलीस आयुक्तालय ठाणे शहर हे करीत आहेत.

