वकिलाच्या घरासमोरील दुचाकी आणि मोबाईलची चोरी

Admin
0

 

Theft of a bike and a mobile phone in front of a lawyer's house

Theft of a bike and a mobile phone in front of a lawyer's house

बार्शी विशेष : वकिलांनी त्यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी आणि त्यांच्या वडिलांचा मोबाईल चोरट्यांनी रात्रीतून पळविल्याची घटना बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथे घडली.

योगेश धर्मराज कोरेकर (वय ३१) रा. नारीवाडी, ता. बार्शी यांनी पांगरी पोलिसांत तक्रार दिली आहे. दि. १ जानेवारीच्या रात्री त्यांनी त्यांची मोटरसायकल घरासमोर लावली होती. जेवण करुन त्यांचे कुटुंबिय झोपी गेले. घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांचे वडिल घराचे बाहेर झोपले होते.

दि. २ जानेवारी रोजी सकाळी सहाचे सुमारास उठून घराबाहेर येऊन पाहिले तेव्हा त्यांना मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी दिसली नाही. ही गोष्ट त्यांनी वडिलांना सांगितली, तेव्हा झोपण्याआधी उशीच्या बाजूला मी ठेवलेला मोबाईल सुध्दा मला दिसला नाही असे वडिलांनी त्यांना सांगितले.

त्यानंतर दोघांनी मोटरसायकल व मोबाईलचा आजूबाजूस शोध घेऊनही न सापडल्यामुळे त्यांनी चोरीची तक्रार पांगरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)