सनदी लेखापाल परीक्षेत बार्शीच्या अभिषेक गुदगेचे यश

Admin
0

 

Success of Abhishek Gudge of Barshi in Chartered Accountant Exam

Success of Abhishek Gudge of Barshi in Chartered Accountant Exam

बार्शी विशेष : आयसीएआयने (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने) नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या इंटरमिजिएट परीक्षा आणि अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून, यामध्ये बार्शीच्या अभिषेक भीमाशंकर गुदगे यांनी यश संपादन केले आहे. 

गुदगे यांचे माध्यमिक शिक्षण संजीवनी पब्लिक स्कूल पन्हाळा येथे, उच्च माध्यमिक शिक्षण शाहू कॉलेज लातूर येथे तर पदवीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे झाले आहे. अकाउंटन्सी विषयात त्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवले होते.

आयसीएआयने घेतलेल्या अंतिम परीक्षेत ६५ हजार २०१ विद्यार्थ्यांनी ग्रुप एकची परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ९६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बार्शीतील इलेट्रॉनिक्स व्यावसायिक  भीमाशंकर कल्लप्पा गुदगे यांचे ते चिरंजीव तर संगमेश्वर महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्रा. नागेश कोल्हे यांचे ते मेव्हणे आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आई, वडील, गुरुजन, मित्रपरिवार, नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)