![]() |
बार्शी विशेष : बार्शी बसस्थानकात आयोजित केलेल्या स्वच्छता सप्ताहात, बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान केले
यावेळी नगरपरिषदेचे आरोग्याधिकारी शब्बीर वस्ताद, आगार व्यवस्थापक सौ. स्मिता मिसाळ, लेखाकार विजय बुटे, वाहतूक नियंत्रक जयसिंग परदेशी, वाहतूक निरीक्षक योगेश कुलकर्णी, स्वच्छ भारत अभियानाचे बार्शी प्रमुख गणेश पाटील, नगरपरिषदेचे स्वच्छता पर्यवेक्षक सोमनाथ झोंबाडे, दत्ता पवार यांच्यासह, लिपीक महेंद्र क्षिरसागर, पंकज सावंत, पुरुषोत्तम वाघुलकर, राजेंद्र कवळासे, बाबासाहेब शिंदे आदींसह नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी व एसटी महामंडळाचे चालक, वाहक उपस्थित होते.
यावेळी बसस्थानकातील परिसर स्वच्छ करून जंतूनाशक पावडर टाकण्यात आली, त्याबद्दल बार्शी आगाराच्या वतीने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
