![]() |
बार्शी विशेष : बार्शी आगारामध्ये आयोजित केलेल्या रस्ते अपघात सुरक्षितता मोहीम २०२३ या कार्यक्रमाचे उद्घाटन सहा.पोलिस निरीक्षक स्वप्निल ईज्जपवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या कार्यक्रमात आगारातील सर्व चालक व वाहक तसेच यांत्रिक कामगारांना, मान्यवरांकडून सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील, बार्शी आगार व्यवस्थापक स्मिता मिसाळ, आगार लेखाकार विजय बुटे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नितीन गावडे, योगेश कुलकर्णी, लिपीक महेंद्र क्षिरसागर, पंकज सावंत, पुरुषोत्तम वाघुलकर, राजेंद्र कवळासे, बाबासाहेब शिंदे आदीसह चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
