कुबोटा ट्रॅक्टर विक्रीत बार्शीचे के. टी. ट्रॅक्टर्स जगात नंबर वन

Admin
0


सलग तिसऱ्या वर्षीही विक्रीचा जागतिक विक्रम कायम

बार्शी विशेष : जपानच्या कुबोटा अॅग्रीकल्चर मशिनरी इंडिया कंपनीचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे कुबोटा ट्रॅक्टरचे वितरक के. टी. ट्रॅक्टर्स, बार्शी यांनी २०२२ या वर्षात ग्राहक सेवा, सेवा समर्थन, ग्राहक समाधान, शाखाविस्तार, सक्षम मनुष्यबळ, विक्रमी ट्रॅक्टर विक्री, कुबोटा ट्रॅक्टरचा बाजारातील हिस्सा आदी मापदंडामध्ये बाजी मारत, सलग तिसऱ्यांदा ट्रॅक्टर विक्रीत जगामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

बार्शी तालुक्यातील खामगांव येथील रहिवासी संतोष ठोंबरे यांनी बार्शी-लातूर रस्त्यावर २०१० साली के. टी. ट्रॅक्टर्स नावाने कुबोटा कंपनीचे शोरुम सुरु केले. अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करत त्यांनी ट्रॅक्टर विक्रीमध्ये भरारी घेण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे सोलापूर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असून दोन्ही जिल्ह्यातील २३ शाखांच्या माध्यमातून ठोंबरे यांनी २०२२ मध्ये १२५२ ट्रॅक्टरची विक्रमी विक्री केली. मागील दहा वर्षात त्यांनी ७५०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची व्रिकी करुन एका नविन मापदंड तयार केला आहे.

के. टी. ट्रॅक्टर्सच्या १ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये कंपनीचे झोनल मॅनेजर सचिन राजमाने यांनी के. टी. ट्रॅक्टर्सने ग्राहकांना दिलेली सेवा, सेवा समर्थन, ग्राहकांचे समाधान, शाखाविस्तार व सक्षम मनुष्यबळ, बाजारातील कंपनीचा बाजारातील हिस्सा वाढविल्याबद्दल कौतुक केले.

के. टी. ट्रॅक्टर्सने देशातच नव्हे, तर जगात कुबोटा कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.

देशातील विविध राज्यामध्ये कंपनीचे सुमारे ३५० पेक्षा जास्त डिलर आहेत. या डिलर्समध्ये के. टी. ट्रॅक्टर्सने सर्वाधिक विक्री केली आहे. ठोंबरे यांनी केवळ विक्री वाढवून पैशाचा विचार न करता, ग्राहकांच्या समाधानाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. विक्री सोबतच त्यांनी या दोन जिल्ह्यामध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा देखील वाढविला आहे. ठोंबरे यांच्यासारखे डिलर आमच्या कंपनीला मिळाले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. 

- सचिन राजमाने, झोनल मॅनेजर, कुबोटा ट्रॅक्टर


Barshi's K. T. Tractors is number one in sales of Kubota tractors

उद्योगासोबत सामाजिक कार्यात ही अग्रेसर 

उद्योगामध्ये अग्रेसर असलेल्या संतोष ठोंबरे यांनी सामाजिक कार्यात देखील आपला सक्रिय सहभाग कायम ठेवला आहे. मातृभूमी प्रतिष्ठान, सहयोग स्थानिक रहिवाशी मंडळ, भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी, बार्शी तालुका क्रिकेट असोशिएशन आदी संस्थांचे अध्यक्ष म्हणून देखील ते प्रभावीपणे लोकहिताचे काम करीत असून, बार्शीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी व्यवसाय करीत असताना ठोंबरे यांनी केलेली ही देश व जागतिक पातळीवरील कामगिरी बार्शीकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब असून त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

ग्राहकांना दिली जात असलेली घरपोच व तत्काळ सेवा, हजर स्टॉकमध्ये उपलब्ध असलेले स्पेअर पार्ट, अनुभवी व प्रशिक्षीत मेकॅनिक, कर्मचारी वृंद व सर्व मित्रपरिवार यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असून, या सर्व यशाचे श्रेय हे ग्राहकांचा के. टी. ट्रॅक्टर्सवर असलेला विश्वास,कर्मचाऱ्यांनीही हे आपलेच शोरुम आहे असे समजून दिलेले योगदान, यामुळेच हे यश संपादन करु शकलो.

- संतोष ठोंबरे, सी.एम.डी., के. टी. ट्रॅक्टर्स, बार्शी


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)