आ. राऊत यांची बार्शी उपसा सिंचन योजनेसंदर्भात कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यासमवेत बैठक

Admin
0

 

MLA Raut's meeting with the officer for action regarding Barshi Upsa irrigation scheme

MLA Raut's meeting with the officer for action regarding Barshi Upsa irrigation scheme

बार्शी विशेष : उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचा पाठपुरावा सुरू असुन लवकरच रखडलेल्या कामाला सुरुवात होणार आहे.

या अनुषंगाने सोलापूर येथे आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी उपसा सिंचन योजनेच्या तावडी तलाव, खामगांव, ढाळे पिंपळगांव तलावात पाणी सोडण्याच्या उर्वरित कामाच्या कार्यवाही संदर्भात सोलापूर येथील भिमा कालवा मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत  बैठक घेऊन, आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी असे अधिकाऱ्यांना सांगितले.

बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असलेली बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी व तालुक्यात हरित क्रांती घडावी यासाठी आमदार राजेंद्र राऊत हे शासन दरबारी सतत प्रयत्नशील आहेत. ही योजना पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील जवळपास १२ हजार ५५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रखडलेली ही उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याचा आमदार राजेंद्र राऊत यांनी चंग बांधला असुन त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

या बैठकीला डी. ए. बागडे, अधीक्षक अभियंता, एस. के. होनखांबे, उप अभियंता, स्नेहलता गावडे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)