ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांना कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान

Admin
0

 

Kawivarya Narayan Surve Literary Award presented to Raja Mane

Kawivarya Narayan Surve Literary Award presented to Raja Mane

बार्शी विशेष : ज्येष्ठ संपादक राजा माने यांना चिंचवड येथे झालेल्या विशेष सोहळ्यात कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार उल्हासदादा पवार व आ. उषाताई खापरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स आणि स्वानंद महिला संस्थेच्यावतीने दिला जाणारा कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, राजा माने यांना त्यांनी लिहलेल्या 'ज्यांनी आभाळ कवेत घेतलं' या पुस्तकाबद्दल देण्यात आला.

चैतन्य सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमांस जैन कॉन्फरन्सचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. सुरेखा कटारिया,  डॉ. सुनिता बोरा, कल्पना कर्नावट, सविता सवणे, साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, अविनाश मोदी, डॉ. रुचिरा मोदी, मनोहरलाल लोढा, ललित कटारिया आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)