सुकन्या खाते सुरू करून माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Admin
0

 

Maasaheb Jijau Jayanti was celebrated in Barshi by starting an account in the names of girls

Maasaheb Jijau Jayanti was celebrated in Barshi by starting an account in the names of girls 

बार्शी विशेष : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने २७ मुलींच्या नावे जय शिवराय प्रतिष्ठानच्या माँसाहेब जिजाऊ सुकन्या योजने अंतर्गत प्रत्येकी ५०० रुपये भरून खाते सुरू करून, त्या खात्यांचे पासबुक वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

मुलींच्या शिक्षणासाठी व पुढील भविष्यासाठी हे खाते सुरू करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये अनेक गरजू मुलींची परिस्थिती जाणून त्यातील २४ गरजू मुलींचा या योजनेत सहभाग घेऊन, त्यांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता संघटनेच्या माध्यमातून करत पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक खात्यात ५०० रुपये जमा करून हे खाते सुरू करण्यात आले.

माँसाहेब जिजाऊ व थोर महापुरुषांच्या विचारांचा वारसा या कार्याच्या माध्यमातून समाजात रुजवण्याचे संघटनेचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भविष्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये मुलींचा सहभाग घेतला जाईल, असे संघटनेच्यावतीने कार्याध्यक्ष मनोज मोरे यांच्याकडून सांगण्यात आले. 

या योजनेतील ५ खात्यासाठी बापूसाहेब कदम यांनी सहकार्य केले तर १९ खाते संघटनेच्या वतीने काढण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते माँ साहेब जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर विविध मान्यवरांचे मनोगत व पासबुक तसेच माहितीपत्रक वितरण करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला. 

यावेळी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव इंजि सौ. सुनीता शेळके-पाटील, सहाय्यक वैद्यकीय अधिक्षक डॉ. शीतल बोपलकर, प्रा. डॉ. वंदना यादव, अॅड. राजश्री डमरे-तलवाड, सौ. शैलजा गीते, सौ. सुवर्णा शिवपुरे व मा. नगरसेवक विजय राऊत, मदन गव्हाणे, संदेश काकडे, प्रा. किरण गाढवे, रवी राऊत, रावसाहेब यादव, अमृत राऊत, बापूसाहेब कदम, उमाकांत राऊत, उमेश काळे, महेश देशमुख, किरण कोकाटे, वसंत हवालदार, तुळशीदास मस्के, कल्याण घळके, अमोल वाडकर, सतिश राऊत, धीरज शेळके, पोस्ट कर्मचारी रविंद्र बगाडे, अजित नडगिरे, त्याचबरोबर सर्व शिवभक्त व जय शिवराय प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)