चार तासांत बुलेट गेली चोरीला; बार्शी-सोलापूर रोडवरील घटना

Admin
0

 

Bullet vehicle stolen within four hours; Incident on Barshi-Solapur Road

Bullet vehicle stolen within four hours; Incident on Barshi-Solapur Road

बार्शी विशेष : मित्राच्या वाढदिवसाला जाताना, सोलापूर रोडवरील एका घरासमोर लावलेली बुलेट रात्रीच्या चार तासांत चोरीला गेल्याची घटना घडली.

ब्रम्हदेव वैजीनाथ मोरे (वय २८ रा. घाणेगांव, ता. बार्शी) यांनी त्यांचे मित्र सुजीत फुलचंद पाटील, (रा. साकत, पानगांव) यांची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट स्वतःचे व शेतीचे कामासाठी वापरावयास घेतली होती.

दि. ९ जानेवारी रोजी रात्री साडेअकराचे सुमाराला मित्राच्या वाढदिवसाला सोलापूर येथे जाताना, मोरे यांनी ती बुलेट महादेव गाडेकर, रा. सोलापूर रोड, उड्डान पुलाशेजारी यांचे घरासमोर लावली होती. वाढदिवस साजरा करुन दि. १० जानेवारीच्या पहाटे साडेतीन वाजता परत आले, तोपर्यंत तेथे लावलेली ती बुलेट चोरीला गेल्याचे आढळून आले.

याबाबची फिर्याद मोरे यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)