![]() |
बार्शी विशेष : महिलांनी संक्रांतीनिमित्त वाण म्हणून रोपे द्यावीत यासाठी वृक्ष संवर्धन समिती, बार्शीच्यावतीने फळांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. समितीने सलग तिसऱ्या वर्षी रोपे वाटपाचा उपक्रम सुरू ठेवला आहे.
याप्रसंगी मधुबन नर्सरीचे प्रविण कसपटे, बार्शी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष संजय बारबोले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्णाताई शिवपुरे, पत्रकार प्रशांत काळे, मल्लिनाथ धारुरकर, प्रा.शशीकांत धोत्रे आदी उपस्थित होते.
या उपक्रमांसाठी मधुबन नर्सरीचे प्रविण कसपटे यांनी रोपे उपलब्ध करून दिल्याबद्दल, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी त्यांचे आभार मानले. महिलांच्याकडून संक्रांतीनिमित्त वाण म्हणून प्लॅस्टिकच्या वस्तू ऐवजी फळ-फुलांची रोपे, झाडांच्या बिया देण्याला प्रोत्साहन मिळावे, हा यामागचा समितीचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रविण कसपटे यांनी वृक्ष संवर्धन समितीच्या विविध उपक्रमाचे कौतुक करुन, यापुढेही वृक्ष संवर्धन समितीच्या पर्यावरणपूरक विधायक कार्याला सहकार्य करण्याचे मान्य केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना फळाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक जाधवर, राहुल दारुतकर, सुनिल फल्ले, गणेश रावळ, उदय पोतदार, बुगडे सर, अजित नडगिरे, अक्षय घोडके, अक्षय काटकर, अक्षय भुईटे, चोबे सर, प्रथमेश नलवडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल तावरे, प्रस्ताविक उमेश नलवडे यांनी केले, तर महेश बकशेट्टी यांनी आभार मानले.
