![]() |
बार्शी विशेष : परांडा येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेले योगेंद्र माणिक खराडे (वय ३९) रा. शिवशक्ती मैदान, होनराव प्लॉट, बार्शी यांनी शहरातील बस स्टँड परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
शनिवारी रात्री साडेआठचे सुमाराला ही घटना उघडकीस आली. योगेंद्र खराडे मागील काही दिवसांपासून या लॉजमधील एका खोलीत राहात होते. त्या खोलीत असलेल्या पंख्याला नायलॉन दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला. लॉज मालकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात त्यांचे शव पाठविले.
बार्शी शहरात स्वतःचे घर असताना, मागील काही दिवसांपासून ते लॉजवर का राहात होते याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत.
