बार्शीतील गजबजलेल्या बाजारपेठेतून भर दिवसा दुचाकीची चोरी

Admin
0

 

A two-wheeler stolen from a busy market in Barshi in broad daylight

A two-wheeler stolen from a busy market in Barshi in broad daylight

बार्शी विशेष : बार्शी शहरातील सतत गजबज असणाऱ्या घाऊक किराणा मालाच्या बाजारपेठेतील दुकानदाराची मोटरसायकल चोरट्यांनी भर दिवसा भर दुपारी पळविली.

याबाबतची फिर्याद सागर प्रदीप मुक्कावार (वय ४६), रा. आडवा रस्ता, बार्शी यांनी शहर पोलिसांत दिली आहे. त्यांचे ऐनापूर मारूती मंदिराजवळ घाऊक किराणा मालाचे दुकान आहे. दि. ४ जानेवारी रोजी त्यांनी दुकानाच्या बाजूला असलेल्या बोळामध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास आपली मोटरसायकल नेहमीप्रमाणे हँडल लॉक करुन लावली. 

त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी जाण्यासाठी मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी ते आले असता, त्यांना तिथे मोटरसायकल दिसली नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला तसेच बार्शी शहर व परिसरात शोध घेतला पण मोटरसायकल मिळून न आल्याने बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बार्शी शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत असूनही, दुचाकी चोरांना पकडण्यात पोलिसांना  अद्यापही यश आलेले नाही, त्यामुळे दुचाकीधारक मात्र धास्तावले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)