![]() |
नागेश दत्तात्रय कांबळे (वय ३८) रा. समर्थ कॉलनी, कासारवाडी रस्ता, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलिसांत दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी दि. ३ जानेवारीच्या रात्री साडेअकराचे सुमारास मांगडे चाळ येथील जुन्या घरी दुचाकीवरून जात असताना, तुळजापूर नाक्याजवळ आलो तेव्हा शिवाजी उर्फ रामा सुरेश राजगुरु हा त्याच्या मार्केट यार्ड गाळ्यातील हॉटेलसमोर थांबला होता. त्याने मला हाक मारून हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि तुला पूर्वीच्या भांडणाच्या केसमधून कोर्टातून मिटवून घेऊन सोडले, पण आज सोडणार नाही असे म्हणून, त्याने व त्याचा मित्र परसू आणि हॉटेलमधील एक कामगार या तिघांनी मिळून मला शिवीगाळी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन, माझ्या डोक्यात कोयत्याने जोरात मारून गंभीर जखमी केले. मी तेथून निसटून हॉटेल बाहेर पळत आलो आणि माझ्या भावाला फोन केला, तेव्हा त्याने मला जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.
