![]() |
बार्शी विशेष : राजकीय लोकांचे विरोधात का बोलतोस म्हणून रिक्षाचालकाला काठी, लाथाबुक्क्यांनी व चप्पलेने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद विनोद विक्रम जाधव (वय ४०) रा. डमरे गल्ली, कसबा पेठ, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादी अलिपूर रोडवरील हॉस्पिटल शेजारच्या रिक्षा स्टॉपवर प्रवाशांची वाट पहात थांबले असताना, त्यांच्या ओळखीचे दत्तात्रय तौर यांनी तेथे जाऊन तू राजकीय लोकांचे विरोधात बोलतो असे म्हणत फिर्यादीस शिवीगाळी करत काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी तक्रार देण्यासाठी त्यांच्या रिक्षाने पोलिस ठाण्याकडे जात असताना, दत्तात्रय तौर व त्यांच्या पत्नीने रिक्षा थांबवून पत्नीने पायातील चप्पलेने मारहाण केली. ही घटना दि. २३ जानेवारी रोजी दुपारी तीनचे सुमारास घडली.
दोघांनी मारहाण करून जखमी केले अशी फिर्याद जाधव यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
