प्रसन्नदाता गणेश मंदिरच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८१ जणांचे रक्तदान

Admin
0

 

81 people donated blood in blood donation camp organized on behalf of Prasannadata Ganesha Temple

बार्शी विशेष : बार्शीचा महाराजा प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने गणेश जयंतीचे औचित्य साधून प्रसन्नदाता मार्ग येथील प्रसन्नदाता गणेश मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात सुमारे ८१ गणेशभक्त रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करत अनोख्या पध्दतीने आपल्या लाडक्या बाप्पाला वंदन केले.

शिबीराची सुरवात सामाजिक कार्यकर्ते व इंडीयन रेडक्रॉस बार्शी शाखेचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या हस्ते प्रसन्नदाता गणपती पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टचे कमलेश मेहता, राहूल कुंकूलोळ, विक्रांत बेळे, बापू झालटे, अशोक परमार, बंडू माने, आनंद लुंगारे, हर्षल रसाळ, धनंजय गायकवाड, प्रमोद भंडारी व सदस्य उपस्थित होते. 

कोरोना महामारी नंतर मागील दोन वर्षे रक्तदान शिबीराचा खंड पडला होता. यावर्षी गणेश जयंती निमित्त  प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रसन्नदाता मार्ग परिसरात रक्तदान शिबीरासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे व अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी कमलेश मेहता यांनी सांगितले. रक्तदान शिबीरात महिला, तरूणांचा उस्फूर्तपणे सहभाग होता. हे शिबीर बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या वतीने घेण्यात आले. गणेश जयंती निमित्त रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित केल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. आभार राहूल कुंकूलोळ यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)