कारने पाठीमागून दिलेल्या धडकेने स्कूटीचालक महिला जखमी

Admin
0

 

A woman scooter driver was injured after being rear-ended by a car

A woman scooter driver was injured after being rear-ended by a car

बार्शी विशेष : कारने पाठीमागून धडक दिल्यामुळे स्कूटीवरुन जाणारी महिला व मुलगा खाली पडून, महिलेचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावर घडली.

सौ. मोहिनी महेश जाधव (वय ३३), रा. गवत गल्ली, बार्शी असे जखमी झालेल्या महिलेचे नांव आहे. त्या व त्यांचा मुलगा भाजी खरेदीसाठी मंडईकडे स्कूटीवरुन जात असताना, साधना कन्या प्रशालेजवळ पाठीमागून आलेल्या एका कारने धडक दिल्याने त्या मुलांसहित खाली पडल्या. कारने दिलेल्या धडकेमुळे त्यांच्या डाव्या पायास जोरात मार लागल्याने पाय फ्रॅक्चर झाला, तर मुलास किरकोळ खरचटले. ही घटना दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी घडली.

दि. ५ जानेवारी पर्यंत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर, याबाबतची तक्रार त्यांनी कार चालविणारे विजयकुमार डुरे पाटील, रा. पाटील प्लॉट, बार्शी यांच्याविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)