बार्शी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी तानाजीराव जगदाळे तर शहर अध्यक्ष पदी ॲड. जीवनदत्त आरगडे कायम

Admin
0

 

Tanajirao Jagdale as Barshi Taluka Congress President and City President Adv. Jeevan Datta aaragade is forever

बार्शी विशेष :  मागील महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये नवीन ब्लॉक  आणि शहर अध्यक्ष नियुक्त केल्याचे संयुक्त पत्र  प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी जिल्हा अध्यक्ष यांना पाठवले होते. 

मात्र या नियुक्त केलेल्या नूतन निवडी बाबत पुढील चर्चा केल्याशिवाय जिल्हा अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र देऊ नयेत अशा सूचना प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार आणि जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना देशाचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केल्या होत्या. त्यानुसार नव्या नियुक्त्या रद्द केल्याबाबतचे आदेश प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी जिल्हा अध्यक्ष याना दिले आहेत. 

Tanajirao Jagdale as Barshi Taluka Congress President and City President Adv. Jeevan Datta aaragade is forever


त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्वच  तालुक्यातील जुन्याच पदाधिकारी यांनी आहे त्या पदावर काम करावे असे आदेश सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी दिले असल्याने बार्शी तालुक्यातील चारे येथील तानाजीराव जगदाळे हेच पुन्हा तालुका अध्यक्ष म्हणून काम करणार असून बार्शी शहर अध्यक्ष म्हणून ॲड. जीवनदत्त आरगडे हेच कायम राहतील. येत्या सर्व निवडणुका मध्ये सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन काम करून पक्षाचे सर्व कार्यक्रम एकत्रितपणे यशस्वी करून पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. 

Tanajirao Jagdale as Barshi Taluka Congress President and City President Adv. Jeevan Datta aaragade is forever


यावेळी मंगळवेढा तालुका अध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, सांगोला तालुका अध्यक्ष सुनील भोरे, मोहोळ तालुका अध्यक्ष सुरेश शिवपुजे , पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी अमरजीत पाटील शहर अध्यक्ष ॲड. राजेश भादुले  माढा तालुका अध्यक्ष अध्यक्ष सौदागर जाधव यांसह सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे , जिल्हा वरिष्ठ जिल्हा अध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी याबाबत सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केल्याने जिल्ह्यातील नवीन निवडीला मिळालेल्या स्थगितीमुळे नेमके तालुकानिहाय पदाधिकारी कोण याबाबतचा संभ्रम संपला आहे. 

बार्शी तालुक्यातील या निर्णयाबाबत वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष तेजस्विनी मरोड, उद्योग व्यापार आघाडी प्रदेश संघटक राजन सिंह मरोड, जिल्हा काँग्रेस शिस्त पालन समिती सदस्य प्रा. जे टी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गाढवे,  अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष वसिमभाई पठाण,जिल्हा चिटणीस गोविंदराव पंके, ओ बी सी विभाग जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह ठाकूर बार्शी शहर उपाध्यक्ष निलेश नाना मांजरे पाटील, युवक काँग्रेस पदाधिकारी संतोष शेट्टी, अल्पसंख्यांक तालुका शहर अध्यक्ष राकेश नवगिरे यांसह सर्व तालुका जिल्हा कार्यकारिणी सेल सदस्यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करून अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)