रस्त्यात टेंपो थांबविल्याच्या कारणावरुन मारहाण; परस्पर विरोधी तक्रारी दाखल

Admin
0

 

On the reason of stopping the tempo on the road; cross complaints were filed

On the reason of stopping the tempo on the road; cross complaints were filed

बार्शी विशेष : रस्त्यात उभा केलेल्या टेंपोच्या कारणावरुन मारहाण झाल्याच्या परस्पर विरोधी दोन तक्रारी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

दि. २५ डिसेंबर रोजी जुनी चाटे गल्ली येथे गर्दीमुळे टेंपो थांबविला असता, रस्त्यात गाडी उभी केली म्हणून मला व माझा मित्र रुपेश लोंढे याला, पवन विटकर व त्याच्या मित्राने दगडाने व पट्ट्याने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. अशी फिर्याद तुकाराम लहू शिंदे (वय २२) रा. बगले चाळ, बार्शी यांनी दिली आहे.

तर दि. २५ डिसेंबर रोजी फुलवारे चौकातून मोटरसायकवरुन जाताना गर्दी असल्यामुळे तेथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेंपोच्या आरश्याला धक्का लागला. तेव्हा आत बसलेल्या दोघांनी गाडी नीट चालवता येत नाही का म्हणून मला व माझा मित्र प्रमोद सुरवसे याला थांबवून लाथाबुक्क्याने मारहाण करुन, रस्त्याच्या कडेला पडलेला दगड पाठीमागून माझ्या डोक्यात मारला व टेंपो घेऊन निघून गेले. अशी फिर्याद पवन राजेश ईटकर (वय २१) रा. सुभाष नगर, बार्शी यांनी तुकाराम शिंदे, रा. सोलापूर रोड, बार्शी व त्यासोबतच्या एका अनोळखी इसमांविरुध्द दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)